share on:

नागरिकांना सन 2016-17 या आ​र्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिलांची रक्कम भरणे सुलभ व्हावे यासाठी महापालिकेची कर वसुली संकलन कार्यालये 30 व 31 मे, 2016 रोजी सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्यावतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

सन 2016-2017 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिले नागरिकांना पोस्‍्टाव्दारे पाठविण्यात आलेली आहेत. जे मिळकतधारक दिनांक 31 मे, 2016 पूर्वी त्याचा देय मालमत्ता कर (थकबाकीसह पहिली व दुसरी सहामाही एकत्रित) महापालिकेकडे जमा करतील, अशा मिळकतधारकांना त्यांच्या बिलातील दुस-या सहामाहीच्या रक्कमेवर 5% सूट मिळणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी मालमत्ता कर संकलन कार्यालये दिनांक 30 व 31 मे,2016 रोजी सायं.7.00 वाजेपर्यत कार्यरत राहणार आहेत. तसेच संगणक/ मोबाईल/ आयपॅड इ.व्दारेही ऑनलाईन पध्दतीने देखील www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरुन मालमत्ता कर जमा करु शकतात.

Leave a Response

share on: