share on:

ठाणे महानगरपालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीतंर्गत म्हाडा वसाहतीमधील धोकादायक जाहिर करण्यात आलेल्या इमारत क्रमांक 54 आणि 55 या दोन इमारती पाडण्याचे काम आज सुरू करण्यात आले. दरम्यान या इमारतींमधील जवळपास कुटुंबाचे स्थलातंरण रेंटल हौसिंगमध्ये करण्यात आले आहे.

म्हाडा वसाहतीमधील इमारत क्रमांक 54 आणि 55 आणि 56 या तिन्ही इमारत महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केल्या होत्या. त्यातील 56 क्रमाकांची इमारत महापालिकेने यापूर्वीच पाडली आहे. या दोन्हीही इमारतींमध्ये एकूण 160 कुटुंबे वास्तव्यास होती. त्यातील 67 कुटुंबे यापूर्वीच स्थलांतरीत करण्यात आली होती.

उर्वरीत 93 कुटुंबांना स्थलातंरीत करून सदर इमारत पाडण्याची कार्यवाही महापालिकेच्यावतीने करण्यात येत होती. तथापि या कारवाईमध्ये वेळोवेळी रहिवाशांकडून अडथळे निर्माण करण्यात येत होते. न्यायालयाकडूनही या कारवाईला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न रहिवाशांनी केला. परतु न्यायालयाने महापालकेच्या कारवाईस स्थगिती देण्याचे नाकारले.

अखेर आज महापालिकेच्यावतीने त्या सर्वच 93 कुटुंबाना दोस्ती विहार आणि दोस्ती इम्पिरिया येथील रेंटल हौसिंगमध्ये स्थलांतरित करून या इमारती पाडण्याचे काम सुरू झाले.

Leave a Response

share on: