share on:

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ३ दिवसात शहर बॅनर्स व होर्डिंग्जमुक्त करा असे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 दिवसात केलेल्या धडक कारवाईमध्ये 1159 अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर्स काढण्याची कारवाई करण्यात आली.

दरम्यान जवळपास ६५ लोकांवर महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे होर्डिंग्ज व बॅनर्स लावल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

गेल्या ३ दिवसात शहरामधील अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर्स काढण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत – 581, कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील – 40, कळवा प्रभाग समिती मधील – 41, नौपाडा प्रभाग समिती – 61, वागळे प्रभाग समिती – 107, रायलादेवी प्रभाग समिती- 230, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती – 18, वर्तकनगर प्रभाग समिती -19, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती – 28, उथळसर प्रभाग समिती – 34 असे एकूण ११५९ अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर्स काढण्यात आले.

सदरच्या कारवाईमध्ये खंड न पाडता सातत्याने कारवाई करुन शहर होर्डिंग्ज व बॅनर्समुक्त ठेवावे असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

Leave a Response

share on: