share on:

सौंदर्यवतींचा शोध घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याना चमकण्याची संधी देणा-या  मिस टिआरा २०१६ या  पहिल्या सौंदर्य स्पर्धेत ठाण्याची दिव्या बागायतकर ( वय २२ वर्षे ) हिने सौंदर्य आणि बुध्दीमत्ताच्या जोरावर पहिल्या क्रमांकाचा ‘मिस टिआरा ग्लोबल’ हा पुरस्कार मिळवला.

मेमरी मेकर्स इव्हेण्ट मॅनेजमेंट कंपनी आणि रेखा मिरजकर फिल्म प्रॉडक्शनतर्फे मिस टिआरा  सौंदर्य स्पर्धा डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात शुक्रवारी संपन्न झाली. मिस वर्ल्ड २००७ किताब विजेती पार्वती ओमनाकुट्टन  आणि रेखा मिरजकर यांनी दिव्या बागायतकर हिला पहिल्या क्रमांकाचा किताब दिला. नारी शक्तीचा संदेश देणाऱ्या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे नेपथ्य होते.

देशभरातून ५०० स्पर्धकातून अंतिम फेरीसाठी ३० जणींची निवड झाली होती. त्यापैकी ठाण्याची दिव्या बागायतकर हिची निवड मिस टिआरा ग्लोबल’ म्हणून झाली. तिला आता अमेरिकेतील मिस एशिया इंटरनॅशनलसाठी भारतातर्फे स्पर्धक म्हणून पाठवण्यात येणार आहे.

 सौंदर्याच्या पलिकडे जाऊन मॉडेल्सच्या कलागुणांवा वाव देणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन रेखा मिरजकर आणि त्यांचे चिरंजीव ऋषिकेश मिरजकर यांनी केले.

या स्पर्धेत नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील श्रेया म्हात्रे (वय वर्षे १९) हिला दुसर्या क्रमांकाचा मिस टिआरा इंटरनॅशनल हा किताब तर तिसर्या क्रमांकांनी विजयी झालेल्या सायली शिंपी (वय वर्षे १९) हिला मिस टिआरा इंडिया कॉन्टीनेन्ट हा किताब देऊन गौरवण्यात आले. चौथ्या क्रमांकाने विजयी झालेले निशा राजपूत (वय वर्षे २०) हिला थर्ड रनरअप आणि पाचव्या क्रमांकाने विजयी झालेली ऋतुजा अहिरे (वय वर्षे १८) हिला फोर्थ रनरअप हा पुरस्कार देण्यात आला.

miss tiara 1-min

प्रथम क्रमांकाने विजयी झालेली दिव्या बागायतकर हि ठाण्यातील कासारवडवली येथे राहते तिची आई गृहिणी असून तिचे वडील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. आपल्या आईने पाठींबा दिला म्हणून मला हे यश मिळाल्याचे सांगितले. मॉडेलिंग बरोबर मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. ठाणे कॉलेज मधून तिने पदवी घेतली असून ती सध्या सनडीटी कॉलेज मधून पुढील शिक्षण घेत आहे.

दुसर्या क्रमांकाने विजयी झालेली श्रेया म्हात्रे हि मुंबईच्या जयहिंद या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिस-या क्रमांकाने विजयी झालेली सायली शिंपी हि ठाण्यातील वर्तकनगर येथे राहते. तिचे शालेय शिक्षण थिराणी हायस्कूलमध्ये झाले आहे. सध्या ती दादरच्या कॅटरिंग कॉलेज मध्ये शिकत आहे.

 यावेळी मिस इंडिया मिस इंडिया एशिया पॅसिफिक २०१२ किताब विजेती हेमांगिनीसिंग याडू, मिसेस ग्लो इंटरनॅशनल २०१५ किताब विजेती इलाक्षी मोरे, बिग बॉस फेम संग्राम सिंग, नच बलिये फेम पायल रोहटगी,अभिनेते अशोक समर, बॉलीवूडमधील दिग्दर्शक राज सैगल, सुमीतदास गुप्ता, अनिस डीन, जान्हवी शहा, डेव्ही स्कॉट आदी मान्यवर उपस्थित होते. कत्थक नृत्यातील नामवंत कलाकार  मयूर वैद्य यांच्या  सहकार्यांनी नटराज बॅले नृत्याचा कार्यक्रम सादर केला.

Leave a Response

share on: