टिटवाळ्यात सायडिंगला उभ्या असलेल्या लोकलला आग

share on:
sliding train

टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ सायडिंगला उभ्या असलेल्या लोकलला शनिवारी पहाटे आग लागली. या आगीमध्ये लोकलचा एक डबा पूर्ण जळून खाक झाला.

पहाटे 4.30 च्या सुमारास ही घटना घडली. ही लोकल सायडिंगला उभ्या असल्याने सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कसाऱ्याकडून येणारी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

आता रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Leave a Response

share on: