पूर्ववैमनस्यातून कारने दीड वर्षांच्या मुलाला चिरडलं

share on:
accident

भिवंडी येथील कोलीवली गावात पूर्ववैमनस्यातून एका दीड वर्षाच्या मुलाला कारनं चिरडल्याचा प्रकार समोर आला असून आरोपी फरार झला आहे.

 devangदेवानंद पाटील आणि विश्वनाथ पाटील यांच्यात गेल्या १५ वर्षांपासून सांडपाण्यावरुन वाद सुरु होता. त्याचा राग मनात धरत विश्वनाथ पाटील याने देवानंद यांचा मुलगा देवांग याला कारने चिरडले आणि तिथून त्याने पळ काढला.

घटनास्थळी देवांगची काकूही उभी होती. चिमुकला देवांग गाडी खाली आल्याचे बघताच तिने आरडोओरड करुन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही चालक विश्वनाथ पाटीलने गाडी चालूच ठेवली.

आधी अपघाती मृत्यूची नोंद भिवंडी तालुका पोलिसांनी केली होती. मात्र आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Response

share on: