share on:
ठाणे जिह्यातील चार्टर्ड अकाऊंटट्सची संघटना असलेल्या ठाणे ब्रॅन्च ऑफ डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएआयच्या वतीने वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ गुरुवार, 24 डिसेंबर रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे संघटनेच्या पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत संपन्न झाला. महोत्सवाचे यंदाचे सातवे वर्ष आहे.

ठाणे ब्रॅन्च ऑफ डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएआय या संघटनेचे ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी अशा या शहरांतील सुमारे 5,400 चार्टर्ड अकाऊंटंट सभासद आहेत तर 17,500 विद्यार्थी आहेत. यामधून 600 सभासद व विद्यार्थ्यांनी या क्रीडा महोत्सवामध्ये भाग घेतला आहे.

या स्पर्धा ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम, पांचपाखाडी येथील सरस्वती शाळा,गडकरी रंगायतन जवळील मारोतराव शिंदे तरण तलाव आणि कोरम मॉल शेजारील शहीद हेमंत करकरे स्टेडिअम या ठिकणी संपन्न होत आहेत. यात स्विमिंग, बॅडमिंटन, बॉक्सक्रिकेट, बुद्धीबळ, कॅरम, टेबल टेनिस आदी स्पर्धांचा समावेश आहे.

24 डिसेंबर रोजी झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये तेजस जाधव याने केऊर ठक्कर याचा पराभव करून विजय संपादन केला तर महिला एकेरीमध्ये निकिता हिने अर्पिता हिला हरवून विजय मिळविला.

Leave a Response

share on: