share on:

अंबरनाथ येथील वार्ड क्रमांक ५ चे शिवसेना नगरसेवक पप्पू गुंजाळ यांच्यावर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घराजवळ प्राणघातक हल्ला करण्यात आला. कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पूर्व वैमान्यातून हा हल्ला झाला असण्याचा प्राथमिक अंदाज असून त्यामुळे अंबरनाथमध्ये तणावाचे वातावरण आहे.

गुंजाळ हे सकाळच्या वेळेस घरातून घरून कार्यालयाकडे जात असताना मोरोविली पाडा येथील वीज वितरणच्या कार्यालयासमोर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला.

गंभीर जखमी झालेल्या गुंजाळ यांना कल्याणातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना दुपारी अडीचच्या सुमारास त्यांचा मुत्यू झाला. दरम्यान ययाप्रकरणी अंबरनाथ पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.

Leave a Response

share on: