share on:

कल्याण शहरात आज दोन  वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या. पहिली घटना कल्याण पश्चिमेत मध्यरात्री 2 वाजता घडली. तर दुसरी घटना कल्याण पूर्वेत सकाळी 6:00 वाजता घडली.

कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक मार्केट परिसरात असणाऱ्या चपलांच्या दुकानाला अचानक आग लागली. त्यात या दुकानासह बाजूच्या इतर दोन  दुकानांचेही मोठे नुकसान झाले. मध्यरात्री साधारण दोन  ते अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या आगीमध्ये दुकानांचा अक्षरशः कोळसा झाला.

तर आगीची दुसरी घटना कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात घडली. सकाळी 6:00 वाजण्याच्या सुमारास या परिसरात असणाऱ्या भंगाराच्या गोदामांना भीषण आग लागली. या गोदामांमध्ये ठेवण्यात आलेल्या भंगाराच्या सामनामुळे अल्पावढीतच आगीने रौद्ररूप धारण केले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Leave a Response

share on: