share on:

जगप्रसिध्द संकरा नेत्रालयाचे व्यवस्थापकीय संचालक पद्मविभूषण डॉ.बद्रीनाथ यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौरांची भेट घेऊन ठाण्यामध्ये संकरा नेत्रालय सुरु करण्यास संमती दिली. त्यामुळे आता जानेवारी 2016 अखेर पर्यंत संकरा नेत्रालयाचा मार्ग मोकळा होणार आहे.

या भेटीमध्यॆ संकर नेत्रालयासाठी आवश्यक असणा-या जागेविषयी चर्चा झाली. या प्रकल्पाची जागानिश्चिती झाल्यामुळे सदर प्रकरण राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर जानेवारी अखेरपर्यंत संकरा नेत्रालयासोबत करारनामा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.

संकरा नेत्रालयाच्या माध्यमातून सुपरस्पेशालिस्ट सेवेबरोबरच संशोधन केंद्रही ठाण्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. या माध्यमातून 40% वैद्यकीय सेवा गोरगरीबांसाठी पुर्णतः निशुल्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये शस्त्रक्रियेचाही सामावेश आहे. तर ठाणे महानगरपालिकेच्या वर्ग 4 च्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Leave a Response

share on: