ठाण्यात एसटी बसला भीषण आग

share on:

ठाण्यातील कासारवडवली पोलीस स्टेशनसमोर आज एसटी बसला भीषण आग लागली.

बसच्या चालक आणि वाहकानी दाखविलेल्या सतर्कतेमुळे सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

याआगीची माहिती मिळताच ठाणे अग्निशमक दलाने घटनास्थळी लगेच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत आगीमध्ये एसटी बस संपूर्णपणे जळून खाक झाली होती.

प्रवाशांनी भरलेल्या या बसमध्ये वाहक आणि चालकाने सतर्कता दाखवली नसती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती.

दरम्यान या बसला नेमकी कशामुळे आग लागली याचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Response

share on: