share on:

घोडबंदर सर्व्हिस रोडमध्ये बाधित होणा-या जवळपास १०० पेक्षा जास्त बांधकामांवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तामध्ये ठाणे महानगरपालिकेने धडक कारवाई केली.

कासारवडवली नाका ते वाघबीळ या दरम्यान घोडबंदर सर्व्हिस रोडवर ही कारवाई करण्यात आली. प्रारंभी या कारवाईस मोठया प्रमाणावर विरोध झाला परंतु महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी पोलिसांच्या मदतीने सदरची कारवाई सुरु ठेवली.

या कारवाईमध्ये अडथळे आणणा-या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

TMC demolition 2 edited-min

याबाबतची सर्व कायदेशीर कार्यवाही दोन महिन्यांपूर्वीच पूर्ण करण्यात आली असून कासारवडवली नाका ते बाळकुम या टप्प्यात बाधित होणा-या बांधकामाचे सर्वेक्षण करुन पात्र आणि अपात्र यांची यादीही निश्चित करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे घोडबंदर सर्व्हिस रोड मोकळा होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.

अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपआयुक्त (अतिक्रमण), अशोक बुरपल्ले, परिमंडळ-3 चे उपआयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ही कारवाई केली.यावेळी उपआयुक्त संदीप माळवी, पोलिस उपआयुक्त श्री. चंदनशिवे आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Response

share on: